Ankylosing spondylitis ला मराठीमध्ये बांबूवात असे म्हणतात. बांबूवात झाला म्हणजे जीवन खराब झाले ही एक कल्पना रुग्णांच्या मनामध्ये असते. पण आपल्याला माहिती आहे का ? खऱ्या आयुष्यात बांबूच्या झाडाचे काही वैशिष्ट्ये !! बांबूचे झाड वाऱ्याच्या झोता प्रमाणे वाकते पण कधीही तुटत नाही ते कोणत्याही परिस्थितीतशी जुळवून घेण्याची क्षमता ठेवते प्रत्येक रुग्णांमध्ये ती क्षमता असते की कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ते अडचणीवर मात करुन वर बांबू प्रमाणे उठू शकतात व जीवनाचा आलेख उंचावर घेऊन जाऊ शकतात.Ankylosing spondylitis हा कंबरेचा संधिवात असून तो साधारणपणे 15 ते 45 वयोगटात होतो. तो लहान मुलांमध्ये पण आढळू शकतो ज्याला Juvenile spondyloarthropathy म्हणतात या बांबूवात पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेने जास्त आढळतो. आता हा कंबरेचा संधिवात आहे म्हणून मुख्य लक्षणे कंबर दुखी ही असते याचा अर्थ असा नाही प्रत्येक कंबर दुखी ही Ankylosing spondylitis असते AS ची कंबर दुखी ही विशेष पद्धतीने आढळून येते जसे की कंबर दुखी ही रात्री झोपल्यानंतर जास्त होते व सकाळ होण्यापूर्वी उदाहरणार्थ 3.00 किंवा 4.00 वाजता होते कधी कधी हे दुखणे जास्त प्रमाणात पण असू शकते जेणेकरून रुग्णांना केवळ कंबर दुखी मुळे जाग येऊ शकते, कुशी बदलताना कमरेत अकडण जाणवू शकते सकाळी उठल्यावर कंबर दुखी व अकडण असते व आपण जसे Activity करतो तसे अकडण कमी होत जाते. उपचार केले नाही तर काही महिने किंवा वर्षानंतर हि कंबर दुखी खालच्या भागातून वाढून वरच्या मणक्याच्या भागातही पसरते आणि नंतर Advanced stage मध्ये मानेच्या मणक्यामध्ये ही पसरते. जर आपण उपचार केले नाहीत तर हे दुखणे व अकडण मणक्यांच्या सांध्यांना एकमेकांना जोडतात व त्यामुळे मणक्यांची लवचिकता व हालचाल मंदावते मणका झुकला जातो व मानेच्या हलचाली थांबू शकता आज-काल विकसित झालेल्या अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे असे advanced disease कमी प्रमाणात बघायला मिळतात.कंबर दुखी शिवाय बांबूवात हा इतर मोठ्या सांध्यांवर पण हल्ला करू शकतो उदाहरणार्थ गुडघे, कोपरे पायाचे, घोटे खांदे इत्यादी व त्यामुळे या सांध्यांमध्ये वेदना सूज किंवहा होऊ शकते याला “Peripheral arthritis” म्हणतात. साधारणपणे 30- 40% रुग्णांमध्ये हे आढळून येते याशिवाय enthesitis ची लक्षणे शकतात. enthesitis म्हणजे अशा जागेची सुज जी स्नायू किंवा Bones दुसऱ्या Bones ला joint करतात. 5 – 10% लोकांमध्ये dactylitis पण आढळून येते जिथे पूर्ण बोट जातो किंवा अंगठा सुजून जातो या शिवाय बांबूवाद डोळ्यांमध्ये (डोळ्यांची लाली येणे दुसर दिसणे डोळ्यांना वेदना इत्यादी) त्वचेवर (Rash psoriasis) इत्यादी विविध विविध पद्धतीने पण दिसून येतो. जर आपणास हे लक्षणे असतील तर रक्त तपासण्या X-ray / MRI इत्यादी पद्धतीने निदान करणे अत्यावश्यक असते. बांबूवादाची मुख्य तपासणी म्हणजे HLA B27 बद्दल आपण आता घेऊया HLA B27 ही एकआहे Jan साधारणपणे बांबू वादाच्या रुग्णांमध्ये आढळून येतो पण याचा अर्थ असा नाही की जर तुम्ही HLA B27 (+ve) आहे तर तुम्हाला बांबूवाद आहे सर्वसामान्य (Normal) जनतेमध्ये सुद्धा HLA B27 (+ve)असू शकतात. बांबूवात ची उपचार प्रणाली ही वेदना कमी करण्यासाठी, दैनंदिन क्रिया, व जीवन सुरळीत चालू ठेवण्यासाठी काही, complications झाले तर ते नियंत्रणात आणण्यासाठी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांची सामाजिक, मानसिक संतुलन या दीर्घ आजारात राखून ठेवण्यास मदत करते. विविध प्रकाराचे कंबरेचे व्यायाम, Yoga, Meditation पण मणक्यांची लवचिकता व सकारात्मक ऊर्जा राखून ठेवण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त Biological सारख्या आधुनिक उपचार पद्धती, मणक्यांच्या शस्त्रक्रिया इत्यादींमुळे पण आजार नियंत्रणात व दैनंदिन क्रिया सुरळीत पणे चालू राहण्यास मदत होते मनका हा शरीराचा मुख्य आधार असतो जेव्हा हा आधार खचून जातो तेव्हा जीवन खचायला वेळ लागत नाही म्हणून अचूक निदान व योग्य ते उपचार लवकर सुरू केल्यास आपण आपल्या या जीवनाचा आधार वाचवण्यास नक्की यशस्वी ठरू शकतो जागतिक Ankylosing spondylitis दिनानिमित्त आपण सर्वास आरोग्यमय शुभेच्छा !!

डॉक्टर प्राची पाटील
संधिवात तज्ञ
Ojas Arthritis And Rheumatology Center
कॉलेज रोड नासिक
9067078031.